Ad will apear here
Next
विवेकानंद महाविद्यालयात राजर्षि शाहू महाराज जयंती साजरी
कोल्हापूर : ‘महाराष्ट्राच्या इतिहासात महात्मा फुलेंनी सुरू केलेली सामाजिक चळवळ पुढे नेण्याचे काम राजर्षी शाहू महाराजांनी केले. वेदोक्त प्रकरणातून त्यांना सामाजिक विषमतेची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी बहुजनांवर होणारा सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक अन्याय दूर करण्यासाठी विविध प्रयत्न केले. त्यांच्या कार्याचे स्वरूप मौलिक, बहुमुखी आणि विविधांगी होते,’ असे मत विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांनी व्यक्त केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

‘राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले. बहुजनांना आपल्या दरबारी नोकऱ्या दिल्या. शाळा, वसतिगृहे सुरू केली. त्याद्वारे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तसेच कोल्हापूर संस्थानच्या आर्थिक विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. शाहू महाराज कलाप्रेमी होते. अनेक कलांना त्यांनी आश्रय दिला,’ असेही डॉ. होनगेकर यांनी सांगितले.

या वेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थी रवी पाटील याने शाहू महाराजांविषयी आपले विचार मांडले. प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ. मंजुश्री घोरपडे यांनी केले. डॉ. सिद्धार्थ कट्टीमनी यांनी आभार मानले. या वेळी डॉ. माधवी चरणकर, सदानंद दुर्गुळे, आर. जी. चौगुले, डी. एम. कांबळे, के. एन. मोरे, संभाजी पाटील आदी मान्यवरांसह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LYXTBD
Similar Posts
विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनदेखील करावे ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना वर्गातील परिपाठाबरोबरच ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करुन, ज्ञान संपादन करावे. समृध्द ग्रंथालये विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी वाढविण्यासाठी सहायकारक ठरतात व विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन करू शकतात,’ असे विचार प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी व्यक्त केले. शिक्षणमहर्षि डॉ
‘विवेकानंद’मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू कोल्हापूर : गोवा येथील जीव्हीके ईएमआरआय आणि कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालय यांच्या वतीने विवेकानंद महाविद्यालयात २० जुलै २०१७ रोजी इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन या पदासाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. १०८ अॅम्ब्युलन्स सेवेकरिता हे पद आहे. जे विद्यार्थी वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र,
विवेकानंद कॉलेजमध्ये भित्तिपत्रिकेचे अनावरण कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘राजकीय व्यवस्था व विचार’ या विषयावरील भित्तिपत्रिकेचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांचा विकास होण्यासाठी व त्यांच्या
‘विवेकानंद’मध्ये ‘जीएसटी’वरील कार्यशाळा कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ व अग्रणी महाविद्यालय क्लस्टर योजने अंतर्गत ‘भारतातील कररचना व जी.एस.टी.’ या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. पी. एस. कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language